Land Record : जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करा..

By Bajarbhav

Published on:

Land Record

Land Record : शेतामध्ये जाण्यासाठी येण्यासाठी नवीन रस्ता काढायचा असेल तर अशावेळी जमिनीच्या हद्दीआपल्याला जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडे नकाशा असावा. आता सरकारने सातबारा आणि आठ-अ उतारा सोबतच नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने नकाशा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे (How to view land Map online).

चला तर मग आज आपण गावचा तसेच शेती जमिनीचा नकाशा नक्की कशा प्रकारे काढायचा आहे याविषयी तपशील माहिती जाणून घेऊया. अलीकडे सरकारने ई-नकाशा हा प्रकल्प नव्याने राबवला आहे, तर हा प्रकल्प नक्की काय आहे याविषयी माहिती पाहूया.

जमिनीचा नकाशा कुठे आणि कसा पाहायचा? How to view land Map online?

ऑनलाइन पद्धतीने जमिनीचा नकाशा काढण्यासाठी तुम्हाला सर्वांना अगोदर गुगल वर mahabhunakasha.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर जागे लागेल. त्या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल.

आता गावाचा नकाशा काढायचा असेल तर याची माहिती सर्वात प्रथम पाहूया. तर अशावेळी वरती सांगितल्याप्रमाणे वेबसाईटवर जायचे आहे आणि वेबसाईट वरती गेल्यानंतर डाव्या बाजूला “Location” असा रखाना दिसेल त्या रकाने मध्ये तुमचे राज्य कॅटेगरी मध्ये रुरल तसेच अर्बन यापैकी निवडायचे आहे (land record update maharashtra). ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल आणि शहरी भागात राहत असाल तर अर्बन हा पर्याय निवडून तुमच्या तालुका, जिल्हा, गाव इत्यादी बाबी निवडायचे आहेत आणि सर्वात शेवटी “Village map” असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.

त्या ठिकाणी “व्हिलेज मॅप” असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर लगेच तुमची शेतजमीन ज्या गावांमध्ये आहे, त्या गावाचा पूर्णपणे नकाशा स्क्रीनवर ओपन होणार आहे. “होम” पर्यायासमोर त्या ठिकाणी आडव्या बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्ही नकाशा फुल स्क्रीन करून पाहू शकता (land map maharashtra). त्या वेबसाईटवर नकाशा “झूम इन” और “झूम आउट” असा पर्याय दिला आहे. त्यावरून तुम्ही नकाशा मोठा वर्ग करून अगदी सविस्तरपणे पाहू शकता.

land record

हे पण वाचा: Solar Agricultural Pump Subsidy: काय सांगता? या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंपासाठी 95% अनुदान, त्वरित ऑनलाईन अर्ज करा व लाभ घ्या..!

land record आता या जमिनीचा नकाशा नक्की कसा काढायचा याविषयी पाहूया. त्या ठिकाणी वर दिलेल्या साईटच्या पेजवर सर्च बाय प्लॉट नंबर या पर्यायावर क्लिक करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक सर्वात प्रथम टाकायचा आहे. तिथून पुढे तुमचा जमिनीचा गट नकाशा त्याठिकाणी ओपन होणार आहे (land map download). नकाशा ओपन झाल्यानंतर डावीकडे “प्लॉट इन्फो” या रकान्यामध्ये तुम्ही जो काही नमूद केलेला गट नंबर आहे, तो नकाशाच्या शेजारी कोणाच्या नावाने आहे. तसेच त्या शेतकऱ्याचे नाव, किती जमीन आहे, अशी सविस्तर माहिती उपलब्ध होते.

एका गट क्रमांक (Survey No) मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे, अशी सविस्तरपणे माहिती या ठिकाणी मिळते.

असा करा नकाशा डाऊनलोड

ही माहिती पाहून झाल्यानंतर डाव्या बाजूला सर्वात प्रथम “मॅप रिपोर्ट” असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. तुमच्या जमिनीचा प्लॉट रिपोर्ट तुमच्यासमोर ओपन होणार आहे. तसेच त्यावर उजवीकडील खालील दिशा नमूद केलेल्या आहेत. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर नकाशा तुम्ही अगदी सहजपणे डाऊनलोड करू शकता.

तुमच्या गटाला लागून सलग असलेल्या शेत जमिनीची गट क्रमांक त्या ठिकाणी दिसणार आहेत, जसे की 322 असा गट क्रमांक असेल तर त्याच्या शेजारील 323, 324, 326, 327 असे इत्यादी गट क्रमांक त्या ठिकाणी दिसतील. यासोबतच खालच्या भागांमध्ये या गटा नकाशात कोणकोणत्या शेतकऱ्यांची नावे तसेच किती क्षेत्रफळ आहे, याची सविस्तरपणे माहिती दिली जाईल Land record In Marathi.

ई-नकाशा प्रकल्प काय?

भूमी अभिलेख (Bhumi Abhilekh) विभागाअंतर्गत तालुका स्तरावरील कार्यालयामध्ये विविध प्रकारचे नकाशे या ठिकाणी साठवून ठेवलेले असतात. अशावेळी नकाशांच्या आधारावर जमिनीच्या हद्दी कायम करण्याचा निर्णय घेतला जातो, परंतु नकाशे या ठिकाणी महत्त्वाचे असतात. परंतु हे नकाशे फार पूर्वीचे, म्हणजे 1880 वर्षापासूनचे असतील, तर ती स्थिती नाजूक असते. त्यामुळे डिजिटल स्वरूपामध्ये या ठिकाणी उपलब्ध देण्याकरिता ही नकाशा हा प्रकल्प सरकारने राबवला आहे.

ये नकाशा प्रकल्पाचे माध्यमातून स्तरावरील उपाध्यक्ष भूमि अभिलेख कार्यालयामध्ये फाळणी नकाशे तसेच भूसंपादन नकाशे यासोबत बिनशेती नकाशे, डिजिटल नकाशे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. डिजिटल सातबारा व आठ अ खाते उतारा सोबतच डिजिटल नकाशा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल. महत्त्वाचा भाग म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाहीत. आपल्याला ही सेवा अगदी मोफत, पणे उपलब्ध करून दिले आहे.

शेता संबंधित कोणतेही काम असो म्हणजे शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता करायचा असेल किंवा शेती जमिनीची विक्री करायची असेल किंवा मोजणी करायची असेल तर अशावेळी शेताचा नकाशा नक्की कसा आहे याविषयी माहिती असणे गरजेचे आहे कारण की शेती जमिनीचा नकाशा आपल्या शेत जमिनीच्या हद्दी आपल्याला माहीत नसतील तर अशावेळी मोठी अडचण निर्माण होते त्यामुळे आपल्या शेत जमिनीचा नकाशा आपल्याला माहित असणे गरजेचे आहे land record.

अशावेळी आता पर्यंत बघितले तर आपल्याला हा नकाशा तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध करून दिला जात होता, परंतु इथून पुढे आपल्याला सरकारच्या माध्यमातून अगदी ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या आपल्याला नकाशे उपलब्ध करून देण्याची सोय केली आहे. घरबसल्या आपल्याला हा नकाशा पाहता येणार आहे त्यामुळे आजचा लेखांमध्ये आपण याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेतली आहे तरी याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी संबंधित तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.

land record
Land Record : जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करा..

Bajarbhav

Related Post

1 thought on “Land Record : जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करा..”

Leave a Comment