Milch Animal Scheme: सरकारने राबवली दुधाळ जनावरे वाटप योजना; गाई-म्हैस खरेदीसाठी किती रक्कम मिळते? कोणते शेतकरी पात्र असतील?

By Bajarbhav

Published on:

Milch Animal Scheme

Milch Animal Scheme : राज्यभरामध्ये दूध उत्पादनाला नव्याने चालना देण्याकरिता विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये दुधाळ जनावरे वाटप योजना सुद्धा चांगल्या प्रकारे राज्यात राबवली जात आहे. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, तसेच इतर दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना दुधाळ जनावरे वाटप या योजनेचा लाभ मिळवून दिला जात आहे. राज्यस्तरावर या योजनेअंतर्गत जे व्यक्ती दारिद्र्यरेषेखाली असतील किंवा अल्पभूधारक शेतकरी असतील यांनासुद्धा अगदी मोफत म्हटले तरी चालेल अशी जनावरे मिळतील.

जिल्हा तसेच राज्यस्तरीय अशा नावेंनी पूर्ण योजना या ठिकाणी राबविण्यात येत होत्या परंतु यामध्ये बघितले तर निकषांमध्ये मोठी तफावत होती ती आता दूर करण्यात आलेली असून, या योजनेच्या माध्यमातून दोन दुधाळ देशी किंवा संकरित गाई तसेच म्हशी अशा गटाचे वाटप योजनेअंतर्गत केले जात आहे (agriculture scheme in maharashtra). राज्यस्तरावर दूध उत्पादनात वाढ व्हावी तसेच राज्यभरामध्ये या राबविण्यात आलेल्या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीस चांगला फायदा व्हावा आणि रोजगाराचे प्रमाण वाढावे इत्यादी उद्देशाने ही योजना राबवली जात आहे.

योजनेचा तपशील:

यासोबतच या योजनेच्या माध्यमातून बघितले तर जिल्हास्तरावर नाविन्यपूर्ण अशा आदिवासी क्षेत्र असलेल्या विविध उपायोजना राबवण्यात आले आहेत. या आधी आपण बघितले तर या योजनेच्या माध्यमातून चार-सहा दोन जनावरांचे गट वाटप केले जात होते (agriculture subsidy in maharashtra). आता त्याऐवजी मंत्रिमंडळामध्ये जो निर्णय घेण्यात आला त्यामध्ये असे सांगण्यात आले की सरसकट दोन जनावरे गट वाटप करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, जो सर्व लाभार्थ्यांना लागू होईल.

योजनेअंतर्गत मिळेल इतके अनुदान:

ही योजना म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मधील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, अहमदनगर, मुंबई उपनगर हे जिल्हे वगळले तर इतर जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जात आहे. तसेच ही योजना राबवण्यावर मोठा भर दिला जात आहे. या योजनेच्या माध्यमातून दुधाळ किंवा देशी, तसेच संकरित गाई म्हशी वाटप केले जात आहे (farming business ideas). गाईंसाठी म्हणजे देशी किंवा संकरित गायी असतील तर 70 हजार रुपये आणि म्हशीसाठी 80 हजार रुपये योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळत आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता:

अगदी जिल्हास्तरावर बघितले तर या योजनेच्या माध्यमातून जैन नागरिक दारिद्र रेषेखालील असतील त्यांना लाभार्थी बनवण्यात येत असून, एक हेक्टर पर्यंत जे शेतकरी अल्पभूधारक आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळवून दिला जात आहे. तसेच, रोजगार किंवा स्वयंरोजगार केंद्रामध्ये नोंदणी असलेले सुशिक्षित बेरोजगार तरुण वर्ग, महिला वर्ग, महिला बचत गटातील व्यक्ती, महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

अशाप्रकारे योजनेत केले विविध बदल:

राज्यस्तरावर बघितले तर या योजनेच्या माध्यमातून 2015 पासूनच आतापर्यंत फक्त आणि फक्त सुशिक्षित बेरोजगार, अल्पभूधारक, शेतकरी, महिला बचत गट यांना लाभ दिला जात होता. त्यामुळे अशावेळी पावसाळी अधिवेशनात विविध प्रश्न याबाबत निर्माण केले जात होत गोष्टीकडे लक्ष देता. जर ही योजना अगदी संयुक्तपणे राबवली तर नक्कीच याचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, या गोष्टी चा विचार करून विविध बदल योजनेमध्ये केले.

लाभार्थींची क्रमवारीने निवड करणार:

असे विविध बदल करण्यात आले आणि पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः सहभागृहामध्ये जे काही प्रश्न विचारले होते त्यावर उत्तर दिले त्याचप्रमाणे आता या योजनेत सुद्धा पाच निकष लागू करण्यात आले आहेत. त्या माध्यमातून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील नागरिकांची लाभार्थी म्हणून निवड केली जाईल तसेच जे दारिद्र्यरेषेखालील नागरिक असतील त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल. अल्पभूधारक शेतकरी, अत्यल्प भूधारक शेतकरी, सुशिक्षण बेरोजगार या सोबतच बघितले तर महिला बचत गट अशा विविध घटकांना या योजनेच्या माध्यमातून अनुदान मिळत आहे.

या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • पासपोर्ट फोटो.
  • ७/१२ उतारा.
  • अनुसूचित जातीचे असल्याबाबत जातीचा दाखला.
  • रेशनकार्ड.
  • घराचा उतारा.
  • रहिवाशी दाखला.
  • 2001 नंतर तिसरे अपत्य नसल्याबाबतचा दाखला.
  • दारिद्र्यरेषेखालील असल्यास त्याचा दाखला.
  • बँकेचे हमीपत्र आवश्यक.

अर्ज कसा व कुठे करावा;

सादर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर संबंधित पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून त्या ठिकाणी या योजने संबंधित सर्वात प्रथम तपशील माहिती जाणून घ्यावी. जर तुम्ही या योजनेस पात्र ठरत असाल तर त्या ठिकाणी अर्ज घेऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे आणि अर्जामध्ये जी काही माहिती भरत आहात ती अगदी व्यवस्थित रित्या माहिती भरायचे आहे. माहिती भरून झाल्यानंतर ती पुन्हा एकदा माहिती चेक करायचे आहे. तपासून घ्यायचे आहे तसेच आवश्यक कागदपत्रांसोबत अर्ज त्या ठिकाणी सादर करायचा आहे. सादर झालेला अर्ज अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बघितला जातो त्याची पडताळणी होते आणि जर तुम्ही या योजनेस पात्र ठरत असाल तर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवून दिला जातो.

हे पण वाचा: Solar Agricultural Pump Subsidy: काय सांगता? या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंपासाठी 95% अनुदान, त्वरित ऑनलाईन अर्ज करा व लाभ घ्या..!

Also Read

Bajarbhav

Related Post

2 thoughts on “Milch Animal Scheme: सरकारने राबवली दुधाळ जनावरे वाटप योजना; गाई-म्हैस खरेदीसाठी किती रक्कम मिळते? कोणते शेतकरी पात्र असतील?”

Leave a Comment