Register heirs online : महत्वाची बातमी! सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करा ऑनलाइन पद्धतीने; पहा सविस्तर माहिती..

By Bajarbhav

Published on:

Register heirs online

Register heirs online 2023 : महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून भूमि अभिलेख विभागाअंतर्गत खासकरून शेतकऱ्यांसाठी खूप असा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. आता भूमी अभिलेख विभागाअंतर्गत जो काही निर्णय जाहीर करण्यात आला आहे त्यामध्ये असे सांगितले आहे की शेतकऱ्यांना जो काही सातबारा आहे तो कोरा करून त्यांच्या वारसांची जी काही नोंदणी असेल ती अगदी ऑनलाईन पद्धतीने त्यांना करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची जी काही धावपळ असेल जी धावफळ शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयामध्ये करावी लागत होती सतत तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या मारून वारस नोंदणी घालावी लागत होती. ती धावपळ आता होणार नाही.

अगदी ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या तुमच्या वारसाची नोंद तुम्हाला व्यवस्थित रित्या मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटर वरून घालता येईल त्यासाठी काय करावे? कोणती प्रक्रिया असेल तसेच कोणत्या वेबसाईटवर जावे इत्यादी तपशील माहिती आपण आजच्या लेखांमध्ये जाणून घेऊया (Satbara Utara Varas Nond maharashtra). कृपया ही माहिती आपल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींनो पर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांनाच ही वारस नोंदणीची माहिती मिळेल आणि त्यांचा वेळ वाचेल.

वास्तविकपणे आपण बघितले तर, पूर्वी वारस नोंदणी करत असताना ऑफलाईन पद्धतीने वारस नोंदणी होत होती. ऑफलाइन पद्धतीने वारस नोंद करत असताना सतत नागरिकांना तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या आणि अशावेळी सातबारा उताऱ्यावर वारस नोंद लावला जात होता (Satbara Utara update). परंतु, कित्येक दातालाठी कार्यालयामध्ये तलाठी हजर नसतात, तसेच रजेवर असतात. जास्त गर्दी सुद्धा असते आणि विविध कारणे असतात, त्यामुळे शेतकऱ्यांना वारस नोंदणी करण्यासाठी वारंवार म्हटले तरी चालेल.

शासकीय कार्यालयामध्ये त्यांना जावे लागत होते, अशावेळी शेतकऱ्यांचे पैसे सुद्धा खर्च होत होते; तसेच त्यांचा वेळ सुद्धा तितकाच जात होता. परंतु, अलीकडे डिजिटल इंडिया च्या माध्यमातून आता सरकारने ही सुद्धा एक मोहीम राबवली आहे. किंवा वारस नोंद आता शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार त्यांना अगदी ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे (satbara utara latest news in marathi). त्यामुळे जास्त विचार करायचे कारण नाही, अगदी बिनधास्तपणे तुम्ही वारस नोंदणी ऑनलाइन पद्धतीने घालू शकता. चला पाहूया याविषयी तपशील.

आपल्याला माहीतच आहे की शेतकऱ्यांना वारस नोंद घालत असताना मोठ्या अडचणींचा सामना नक्कीच करावा लागत होता. त्यामध्ये त्यांचा वेळ तितकाच वाया आणि पैसे सुध्धा वाया जात होते. आणि ठिकाणी वारस नोंद करत असताना शेतकऱ्यांकडून जास्तीचे पैसे सुध्धा घेतले जात होते (Satbara Utara 2023). त्यामुळे अशावेळी शेतकऱ्यांना पैसे देण्यापासून दुसरा कोणता पर्याय नसायचा आणि आर्थिक दृष्ट्या शेतकऱ्यांची पिळवणूक सुध्धा होत होती. परंतु, ही पिळवणूक थांबवण्यासाठी तसेच वारस नोंद करण्यासाठी जो काही वेळ वाया जातो तो वेळ वाया जाऊ नये यासाठी प्रशासनाने ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली आहे. आता नागरिक म्हणजेच शेतकरी ऑनलाईन पद्धतीने वारसाची नोंदणी घालू शकणार आहेत.

प्रशासनाने हा जो काही महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अगदी घरबसल्या जी काही वारसाची नोंदणी आहे ती करता येईल; म्हणजेच आता वारस नोंदणीसाठी अगदी ऑनलाईन पद्धतीने म्हटले तरी चालेल. अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना तलाठीच्या माध्यमातून त्याची पडताळणी ऑनलाईन पद्धतीनेच होईल आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच वारस हा सातबारा उताऱ्यावर त्वरित जोडला जाणार आहे. अशी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होईल.

या ठिकाणी करा ऑनलाईन वारस नोंदणी (Register heirs online)

ठीक आहे, तर ऑनलाईन वारस नोंदणीसाठी नक्की अर्ज कसा व कोठे करावा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही नोंदणी आता एक ऑगस्ट 2023 पासून अगदी ऑनलाईन पद्धतीने आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे. सर्वात प्रथम, शेतकऱ्यांनी https/pdeigr.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सर्व माहिती वाचून घ्यायचे आहे आणि तुमच्या सातबारावर वारस नोंदणी करायची असेल तर याच वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

ज्यावेळी तुम्ही या वेबसाईटला भेट देणार आहात त्यावेळी सर्वात प्रथम तुम्हाला वेबसाईटवरील जो काही सार्वजनिक डेटा एन्ट्री पृष्ठ आहे, तो उघडावा लागेल आणि त्या ठिकाणी पेज ओपन केल्यानंतर पुढे “प्रोसिड टू लॉगिन” असा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करावे. सर्वात प्रथम, तुमचे खाते त्या ठिकाणी उघडायचे आहे. खाते उघडल्यानंतर त्या ठिकाणी जी काही महत्त्वाची माहिती आहेच, महत्वाचे मुद्दे आहेत, ते व्यवस्थित रित्या वाचून घ्यावेत आणि त्या ठिकाणी “ऑनलाइन अर्ज” असा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

हे पण वाचा: Milch Animal Scheme: सरकारने राबवली दुधाळ जनावरे वाटप योजना; गाई-म्हैस खरेदीसाठी किती रक्कम मिळते? कोणते शेतकरी पात्र असतील?

Also Read

ऑनलाइन अर्ज सादर करत असताना सर्वात प्रथम त्या ठिकाणी जी आपण माहिती भरणार आहोत, ती अगदी व्यवस्थित कोणतेही चूक न करता माहिती भरायचे आहे आणि माहिती भरल्यानंतर व्यवस्थित रित्या पुन्हा एकदा ती माहिती तपासून घ्यायची आहे, कारण की तुम्ही जी माहिती भरणार आहात ती माहिती चुकली तर तलाठी यांच्या माध्यमातून जी काही तपासणी होते, त्या तपासणी मध्ये तुमचा अर्ज रिजेक्ट केला जातो आणि तुमच्या वारसाची नोंद लागत नाही त्यामुळे व्यवस्थित माहिती भरून शेवटी अर्ज सबमिट करायचा आहे. तलाठी पुढची प्रक्रिया करतील आणि वारस नोंद होईल.

Register heirs online : महत्वाची बातमी! सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करा ऑनलाइन पद्धतीने; पहा सविस्तर माहिती..

Bajarbhav

Related Post

1 thought on “Register heirs online : महत्वाची बातमी! सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करा ऑनलाइन पद्धतीने; पहा सविस्तर माहिती..”

Leave a Comment